गेली २५ वर्षे भारतीय जैन संघटना विद्यालयाचे नाव पुणे जिल्ह्यामध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये
आदराने घेतले जाते याचे कारण विद्यालयाची आदर्श अशी परंपरा उत्कृष्ट विद्यार्थी घडविण्याचा
घेतलेला ध्यास विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठीचे विद्यालयाचे प्रयत्न.
विद्यालयामध्ये सद्य सद्यस्थिती मध्ये इ. ५ वी ते १२ वी पर्यंतचे एकूण ४०४० विद्यार्थी सेमी इंग्रजी व
मराठी माध्यमातून शिक्षण घेत असून मेळघाट येथील विद्यार्थी ठाणे भागातील आदिवासी विद्यार्थी
महाराष्ट्रातील अनाथ विद्यार्थी शिक्षणासाठी येतात . विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्यासाठी वस्ती गृहाची
सोय उपलब्ध आहे .
उच्च माध्यमिक विभागामध्येकला वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखा आहेत. तसेच संगणक शास्त्र व
माहिती तंत्रज्ञान हे विषयही विद्यार्थांना इच्छिक स्वरुपात उपलब्ध करून दिले जातात . विद्यालयाचा
दरवर्षी १० वी १२ वी बोर्डाचा निकाल हा नेहमीच ९९% च्या आसपास असतो. त्यामुळेच प्रवेशासाठी
विद्यार्थी पालकांची प्रचंड मागणी असते.
विद्यालयातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी विद्यालय सतत
प्रयत्नशील असते. त्यासाठी विद्यालयामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्यमाध्ये नवीन
प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत क्रीडा स्पर्धा निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा एन एस एस शिबीर हिवाळी शिबीर
विज्ञान प्रदर्शन कथाकथन स्पर्धा रांगोळी स्पर्धा काव्य वाचन स्पर्धा विविध सहलीचे आयोजन क्षेत्रभेटी
वार्षिक स्नेह सम्मेलन अश्या अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
या बरोबरच विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या विविध शिष्यवृत्ती लाभ योजना यासाठी मार्गदर्शन केले
जाते . विद्यालायचे प्रशासकीय काम नियोजनबद्ध तसेच दर्जेदार व्हावे यासाठी २५ पेक्ष्या अधिक
समित्या कार्यरत आहेत त्याचे नियोजन विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री पवार पी आर व उप प्राचार्य श्री
देशमुख दिलीपकुमार हे करत असतात विद्यालयातील सवें सहकारी अतिशय तळमळीने सहकार्य करीत
असतात
विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत विविध उपक्रम राबविले जातात त्यातील जीद्य या अंकाचे
प्रकाशन हा एक भाग आहे मुलांच्या लेखन कलेला वाव मिळावा म्हणून विद्यालय दरवर्षी वार्षिक अंक
प्रदर्शित करत असते. विद्यालायत वर्ष्याभर कार्यक्रमांची रेलचेल असतेयात निबंध स्पर्धा नाट्य स्पर्धा
वादविवाद स्पर्धा प्रश्न मंजुषा क्रीडा महोत्सव व NTS MTS या सारख्या स्पर्धा परीक्षा आयोजित करून
विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी विद्यालय प्रयत्न करत असते . या उपक्रमानाबरोबर
विद्यालायचा १० वी व १२ वी चा निकाल दरवर्षी उंचावत आहे. १० वी व १२ वी च्या उज्ज्वल यशाची
परंपरा हे आमचे वैशिठे बनले आहे यामुळे आम्हाला अभिमानाने सांगावासे वाटते की मुलांच्या
प्रवेशायासाठी या विद्यालयात पालकांच्या रांगा लागतात ही आमच्या गुणवतेची पावती म्हणावी लागेल.
विद्यालाय्च्या या यशस्वी वाटचाली मध्ये भारतीय जैन संघटनेचे संस्तापक अध्यक्ष श्री शान्तीलालजी
(भाऊ ) मुत्था , भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष आदरणीय प्रफुल्लजी पारख शालेय समितीचे अध्यक्ष
आदरणीय अरुणजी नहार व सर्व सदस्य यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत असते याबरोबरच
विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पालक विद्यार्थी या सर्वांचे धन्यवाद.
प्रा संतोष भंडारी
प्राचार्य