BJS College

भारतीय जैन संघटनेचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ,वाघोली, पुणे.


 BJS CollegeClick here for Information of Interview for B.J.S. School And Junior College


Shantilal

सामाजिक योगदान

 bjs college  bjs college  bjs college  bjs college

भारतात अनेक स्वयंसेवी संस्था , संघटना विविध क्षेत्रात काम करत असतात. इ . स . १९८५ पासून भारतीय जैन संघटना संस्थापक अध्यक्ष मा शान्तिलालजी मुथा यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक आपत्ती व्यवस्थापन व शैक्षणिक क्षेत्रात अत्यंत उल्लेखनीय कार्य करत आहेत आपण या समाजाचे ऋणी आहोत आणी या समाजासाठी कार्य करणे हे आपले सहज कर्तव्य आहे या भावनेतून मागील ३३ वर्ष्यापासून निस्पृह भावनेतून कार्य करत आहे.

लग्नात होणारा प्रचंड खर्च पाहून सामुहिक विवाहाच्या माध्यमातून हा खर्च कमी करता येईल व कुटुंबावर होणारा आर्थिक तान सोडविणे शक्य आहे या जाणीवेतून महाराष्ट्रात सामुहिक विवाहाची चळवळ मा. शांतीलाल मुत्थाजी यांनी राबवली आणी आज महाराष्ट्र नव्हे तर देश्यात कित्येक सामुहिक विवाह सोहळे केले जात आहे. वधु वर सूचक मेळावे विधवा विधुर वधु वर मेळावे या सारखे सामाजिक कार्य संस्थे मार्फत अविरत चालू आहे. एकाच वेळी ६२५ सर्व धर्मीय सामुहिक विवाहाचे आयोजन करून ते पार पाडले . या क्षेत्रात एक नवीन विक्रम संस्थे मार्फत केला गेला.

डिसेंबर १९९२ मध्ये अयोध्या येथे बाबरी मशीद पाडण्याची घटना घडली व संपूर्ण देश्यात याचे पडसाद उमटले. संपूर्ण देश्यात मोठे दंगे सुरु झाले या वेळी सर्व धर्म गुरु एकत्र करून दंगे शमविण्यासाठी शांती यात्रेचे आयोजन करण्यात आले व ती शांती यात्रा अत्यंत यशस्वी झाली.

३० सप्टेंबर १९९३ रोजी लातुरला बुकंप झाला आणी संपूर्ण देश हादरला या प्रलयकारी भूकंपाने होत्याचे नव्हते केले प्रचंड प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली. या वेळी श्री शान्तीलालजी मुत्था यांनी मानवतेच्या दृष्टीकोनातून मदतीला जाणे आवश्यक वाटले आणी संघटनेच्या कार्य कर्त्यासमवेत काही तासातच भूकम्पग्रस्त भागातील लोकांना जेवणाची पाकिटे देण्यास सुरुवात केली. त्यचबरोबर भूकंपाने धक्का बसलेल्या पुढच्या पिढीला सावरण्याची जबाबदारी व त्यांच्या शिक्षणामध्ये अडथळा न येवू देता त्यांनाशिकविण्याची जबाबदारी संस्थेने घेतली. अत्यंत धाडसी निर्णय घेतला गेला आणी भूकंपाने ग्रस्त १२०० मुले पुण्याला शिक्षणासाठी आली त्यांच्या राहाय्ण्याची जेवणाची व शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली प्रथम पिंपरी या ठिकाणी व त्यानंतर वाघोली या ठिकाणी शिक्षनिक प्रकल्प सुरु झाला त्यनंतर या प्रकल्पात महारास्थ्रातील अनेक जिल्ह्यातील आई किवा वडील नसणाऱ्या अनाथ विद्यार्थ्यांना शिक्षणाची सधी देण्यात आली त्याचप्रमाणे मेळघाट व ठाणे परिसरातील आदिवासी विद्यार्थी नियमित पणे या प्रकल्पात शिक्षणासाठी येत आहेत.

२६ जानेवारी २००१ मध्ये गुजरात मधील भूजला अत्यंत मोठा भूकंपाचा धक्का बसला या वेळी वाघोली शैक्षणिक प्रकल्पातील विद्यार्थी शिक्षक यांनी गुजरातला जावून मदत कार्य केली. भारतीय जैन संघटनेने ३६८ शाळा बांधून तत्कालीन पंतप्रधान मा. अटलबिहारीजी वाजपेयी यांच्या हस्ते गुजरात सरकारला हस्तांतरीत केल्या . या कार्याबरोबर स्तुनामी बाधीत क्षेत्रात तामिळनाडू या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात मदत कार्य केले जम्मू काश्मीर बुकंप, बिहार पूर , नेपाल भूकंप या सारख्या आपतीत संस्थेचे योगदान महत्वपूर्ण आहे.

सामाजिक व आपत्ती व्यस्थापन करत असताना शैक्षणिक क्षेत्रात संस्थेने मूल्य शिक्षणाचा प्रयोग प्रथम बीड जिल्ह्यात व त्या नंतर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात सुरु केला. स्मार्ट गर्ल प्रकल्प आज शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे जिल्ह्यात व सह विविध जिल्ह्यात सुरु आहे. ऑक्टोबर २०१५ मध्ये संस्थेने शेतकरी आत्म्हत्याग्रस्त मुलांना शिक्षणासाठी पुण्यात आणले व त्यांचे शैक्षणिक पुनर्वसन करण्याची जबाबदारी स्वीकारली वाघोली शैक्षणिक प्रकल्पात हे सर्व विद्यार्थी अत्यंत तन्मयतेने शिक्षण घेत आहे.

महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करण्यासाठी संस्थेने प्रथम बीड जिल्ह्यातील नदीपात्र , तलाव , नाले यातील गाळ उपसण्याचे कार्य केले. पाणी फौंडेशनच्या सहकार्याने वाटर कप स्पर्धेत सहभागी असलेल्या गावांना मोफत जेसीबी व पोकलेन मशीन पुरविण्यात आले असून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी संघटनेमार्फत प्रतिनिधी नेमून महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करण्याचा संकल्प केला आहे. पुणे जिल्हा दुष्काळ मुक्त करण्याच्या हेतूने देश्यातील एक महत्वपूर्ण प्रकल्प बुलढाणा या जिल्ह्यात चालू आहे. १३८ जेसिबीच्या साह्याने संपूर्ण जिल्ह्यातील नदी नाले व तलाव यातील गाळ काढून अधिक पाणी साठवण शमता वाढवली व जिल्हा दुष्काळ मुक्त करून एक नवा आदर्श देश्यापुढे ठेवण्याचे काम संघटनेने केले आहे.

संघटनेच्या या कामाची पावती म्हणून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार संस्थेला प्राप्त झाले आहेत यात राष्ट्रपती श्री एकनाथ कोविंद यांच्या शुभ हस्ते शैक्षणिक क्षेत्रासाठी राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार प्राप्त झाला आहे. संघटनेच्या या कार्यात सर्व पद आधीकारी कार्यकर्ते विध्यार्थी यांचे बहुमोल सहकार्य मिळत असते.